xtreme2day 07-05-2024 16:11:44 1997705
लोकसभा निवडणूक 2024 - बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार, उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि श्रीमती आशाताई पवार यांच्या समवेत बजावला मतदानाचा हक्क महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला भेटी...! बारामती (प्रतिनिधी) - आज सकाळी ७ वाजता काटेवाडी गावातील मतदान केंद्रावर सुनेत्रत्रा वहिनी पवार यांनी त्यांच्या सासूबाई म्हणजेच आई श्रीमती आशाताई पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. आता पुढचा प्रवास असेल तो तमाम जनतेच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचा. आजपर्यंत लाभलेली तुमच्या सर्वांची सोबत, प्रेम, आशिर्वाद या पुढच्याही प्रवासात कायम राहुद्या, या अपेक्षेसह आपण सर्वांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा असे नम्र आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केले. तर उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय दादा पवार यांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला...! *महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सासवड मध्ये एकत्र मतदान केंद्र प्रतिनिधी व मतदारांची भेट घेतली..!* बारामती लोकसभा मतदारसंघाचा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार सासवड मध्ये आले असता शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी त्यांचे स्वागत करत एकत्र मतदान केंद्राला भेट दिली व मतदानाची माहिती घेतली. यावेळी पोलिंग बूथ ठिकाणी सुनेत्रा वहिनी पवार आल्या असता स्थानिक मतदारांशी त्यांनी आपुलकीचा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.