xtreme2day 30-04-2024 17:23:29 66670
'होय मी अस्वस्थ पण...' मोदींच्या 'भटकती आत्मा' टीका झोंबली शरद पवारांना ; दिलं आज जोरदार प्रत्युत्तर ! ओतूर (प्रतिनिधी) - : ‘राज्यातील एका बड्या नेत्याने ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुरू केलेल्या खेळाने महाराष्ट्रात अस्थिरतेचा कालखंड सुरू झाला. त्यामुळे अनेक मुख्यमंत्री आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. या ‘भटकत्या आत्म्या’ने १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला; तसेच २०१९ मध्येही राज्याच्या जनादेशाचा अवमान केला. महाराष्ट्र या आत्म्याला बळी पडला असून, आता देशही अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता हल्ला चढविला. त्यांच्या याच टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुण्याच्या संदर्भाने विविध विकासकामांचा उल्लेख करून यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. साहजिक राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मोदींविरोधात संताप व्यक्त केला. तसेच शरद पवार यांनीही मोदींच्या टीकेचा समाचार घेऊन त्यांना जोरदार उत्तर दिले. शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणातून सांगितले होते. काल त्यांनी सांगितलं राज्यात एक अंतर आत्मा अस्वस्थ आहे, तो आत्मा गेली ४५ वर्षे महाराष्ट्र आणि इथल्या राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. आत्मा अस्वस्थ आहे हे खरंय, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी मोदींना दिले. सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, ही शिकवण आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे, तसे संस्कार त्यांनी आमच्यावर केले आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असेही पवार म्हणाले.
🚩1947 पासून तर तुमचे च सरकार होते. तेव्हा सर्व काही चांगले करता आले आसते. आता जनतेचे चांगले हित करण्या साठी स्वतः परमेश्वराने प्रत्यक्ष साधू संताना देशाच्या मुख्य पदावर बसवले आहे. एव्हढ ही नाही कळत आज तुमच्या मुळे 70 वर्ष देश पाठी मागे होता आता कुठे तरी देश सुरळीत चाललाय ते पण तुम्हाला पाहवत नाही .🌹🙏