काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं’, पंतप्रधान मोदींचा साताऱ्यात साधला निशाणा
xtreme2day
29-04-2024 23:14:49
89589
काँग्रेसने 40 वर्ष सैनिक कुटुंबांना वंचित ठेवलं’, पंतप्रधान मोदींचा साताऱ्यात साधला निशाणा
कराड (विशेष प्रतिनिधी) -"मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं", अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज साताऱ्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “साताऱ्याची ही भूमी शौर्याची भूमी आहे. आज मिलिट्री आपशिंगे गाव असो किंवा साताऱ्याचा कोणतही सैनिक परिवार असेल, आत्मनिर्भर भारतीय सेनेला पाहून ते सर्वात जास्त आनंदी आहेत. आपल्या सेनेकडे आज एकापेक्षा एका भारतीय बनावटीचे हत्यार आहेत. आता तुम्हीच सांगा, असे कामे करुन मोदींनी ज्यांची दुकाने बंद केली ते खूश होतील का? हत्यारांच्या ज्या दलालांना काँग्रेसचं सरकार खूप चांगलं वाटतं होतं ते मोदीची वाहवाह करतील का?”, असे प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केले.
“मोदीने सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनची गॅरंटी दिली होती. मोदीने ही गॅरंटी पूर्ण करुन दाखवली. कोण कसं विसरु शकतं की काँग्रेसने 40 वर्षांपर्यंत सैनिक कुटुंबांना वन रँक वन पेन्शन पासून वंचित ठेवलं. फक्त 500 कोटी रुपये दाखवून ही योजना आणणार असे सांगायचे. खोटं बोलण्यात त्यांची मास्टरी आहे. भाजपच्या सरकारने आज या योजनेचे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे माजी सैनिकांना देवून टाकले आहेत”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
“देश 1947 मध्ये स्वातंत्र झाला. काँग्रेसने गुलामीच्या मानसिकतेला फुलू दिलं. आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारला मानतं. जगात आजही जेव्हा नौसेनाचा विषय निघतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. पण इतक्या वर्षांपर्यंत स्वातंत्र भारताची नौसेनामध्ये इंग्रजांच्या पाऊलखुणा होत्या. एनडीए सरकारने त्या इंग्रजांच्या पाऊलखुणा हटवल्या”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
एनडीएचं सरकार एवढ्यावरचं थांबलं नाही, तर या झेंड्याची ताकद तेव्हाच वाढेल जेव्हा नौसेनाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकला स्थान दिलं जाईल. आम्ही ते स्थान दिलं. आमच्या सरकारने मराठा सेनेद्वारे बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत सहभागी करण्यासाठी अर्ज केला आहे. महाराष्ट्राचा लोहगड, सिंधुदुर्ग असेल, किंवा मराठा सैनिकांकडून तामिळनाडूत बनवण्यात गेलेला जिंजी किल्ला असेल, या सगळ्यांना वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
“भारताचा जगात गौरव झाला तर काँग्रेसला त्याचा त्रास होतो. मोदी हे सर्व कामे का करत आहे? असं त्यांना वाटतं”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. “काँग्रेसने 70 वर्षांपैकी 60 वर्ष देशावर राज्य केलं. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान काश्मीरमध्ये लागू होत नव्हती. कलम 370ची भिंत निर्माण केलेली होती. आपल्या आशीर्वादाने आपला सेवक मोदीने कलम 370 ला उद्ध्वस्त केलं. कब्रस्तानमध्ये गाडून टाकलं. कलम 370 हटवून देशाच्या एकात्मतेला ताकद मिळाली की नाही? ही गॅरंटी मोदीने आपल्याला दिली होती. ती गॅरंटी मोदीने पूर्ण केली”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.