Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 चंद्रपूर

चंद्रपूरच्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत मिळविले यश

xtreme2day   28-04-2024 21:47:28   87505

चंद्रपूरच्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत मिळविले यश

 

चंद्रपूर, दि. 27 : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

 

 यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  प्रितिका जंगु करपाते, रा. भारी  (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना  (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक  स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती