xtreme2day 27-04-2024 23:13:38 189083
नाशिकच्या रणांगणात भाजपचे आता महंत अनिकेत शास्त्री उतरले, विद्यमान खासदार गोडसेचा पत्ता कट ? नासिक (विशेष प्रतिनिधी) - भाजपनं आपल्याला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितल्याचं म्हणत महंत अनिकेत शास्त्रींनी नाशिकचा पेच आणखी वाढवला आहे. पक्षश्रेष्ठींशी वेळोवेळी चर्चा झाली. माझे गुरु आणि भाजप खासदार साक्षी महाराज यांच्यासोबतही संवाद झाला. राज्य आणि केंद्रीय पातळीवर सकारात्मक चर्चा झाली असल्यानं येत्या २ दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करेन, असं अनिकेत शास्त्री म्हणाले आहेत. नाशिकचे विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकदा मुंबईच्या वाऱ्या केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केल्या. शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांनी हेमंत गोडसे यांनी गोडसेंना उमेदवारी जाहीर केली. पण अद्याप तरी पक्षानं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे गोडसेंचं काय होणार हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, महायुतीला नाशिकच्या जागेवरील तिढा अद्याप तरी सोडवता आलेला नाही. शिवसेनेचा खासदार असलेल्या नाशिकवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडला आहे. पण राष्ट्रवादीनं या जागेवरील दावा कायम ठेवला आहे. नाशकात आमचीही चांगली ताकद आहे, असं म्हणत भाजपनंही या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे नाशिकचा पेच कायम आहे.