Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 सोलापूर

सोलापूर मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार ; अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी कार्यकारिणीची मदत होत नसल्याचा केला आरोप !

xtreme2day   24-04-2024 02:41:21   167609

सोलापूर मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार ; अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी कार्यकारिणीची मदत होत नसल्याचा केला आरोप !

 

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला चार दिवसांचा अवधी शिल्लक असून तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोलापूर मतदारसंघात  सोलापूरच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीचे (vanchit Bahujan aghadi) उमेदवार राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे.

 

राहुल गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या माघारीने सोलापुरातील समीकरण बदलणार आहे. वंचितची स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही तसेच माझ्या उमेदवारीने भाजप उमेदवाराचा फायदा होईल हे लक्षात आल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.   
 
 राहुल गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर म्हटले की, आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. सोलापुरातून माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर १५ दिवसापासून मी सोलापूर मतदारसंघात फिरत आहे. मी सोलापूरमधील वंचितच्या कार्यकारिणीला भेटलो तसेच मतदारांनाही भेटलो. या १५ दिवसात मी खूप काही अनुभवले. या काळात मी जे अनुभवले ते चळवळीत अभिप्रेत नाही. सोलापुरातील भोळीभाबडी जनता आंबेडकर या एका नावासाठी भावनिक असून त्यांना प्रचंड आदर आहे. मात्र चळवळीसाठीची कार्यकर्त्यांची फळी पोषक नसून खूपच पोकळ आहे.     
 
सोलापुरातील वंचितच्या कार्यकारिणीत स्वार्थ दिसत आहे. त्यामध्ये बाबासाहेबांचे स्वप्न दिसत नाही. मी सोलापूर मतदारसंघात लढण्यासाठी उतरलो होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, मला मैदानात लढण्यासाठी सोडलं असून माझ्या हातात बंदुक तर आहे मात्र त्या बंदुकीत गोळ्या नसून त्यात छर्रे आहे. याच्या मदतीने मी युद्ध तर लढेन मात्र जिंकू शकणार नाही, असं गायकवाड म्हणाले.     
 
मी शेवटपर्यंत लढलो तर भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यासारखं होईल. माझ्या अर्धवट युद्धाने भाजपच्या उमेदवाराला अनुकूल वातावारण निर्माण होण्याची भीती आहे. माझ्यामुळे भाजपचा एक नेता संसदेत जाईल व त्यामुळे संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. असे कृत्य माझ्याकडून होऊ नये, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटण्याचा निर्मणय घेतला आहे, असं स्पष्टीकरण राहुल गायकवाड यांनी अर्ज माघारीनंतर दिलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती