जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने अहिंसा - शांतता प्रसारार्थ 'अहिंसा रन रॅली ' मध्ये 1834 जणाचा उत्साही सहभाग - जय जिनेंद्रचा जल्लोष
xtreme2day
31-03-2024 20:53:28
1189794
जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने अहिंसा - शांतता प्रसारार्थ 'अहिंसा रन रॅली ' मध्ये 1834 जणाचा उत्साही सहभाग - जय जिनेंद्रचा जल्लोष
कोल्हापूर (आर. मकोटे जिल्हा प्रतिनिधी यांजकडून) - कोल्हापूर चॅप्टर अर्थात जैन इंटर नॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन सामाजिक मुल्य वर्धन स्तरावर कार्य करत असलेल्या संघटनया संघटनेच्या वतीने ३१ मार्च रोजी 'अहिंसा रन रॅली" ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरण आणि जय जिनेन्द्र च्या जल्लोषात पार पडली . रविवारी पहाटे पोलीस ग्राऊंडवर पहाटे सहा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या सह कोल्हापूर चॅप्टर चेअरमन गिरीष शहा, अनिल पाटील रमणलाल संघवी , जितेंद्र राठोड आणि जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
प्रांरभी सर्वाचे स्वागत करताना गिरीष शहा यांनी 'मनात असलेले अहंकार, राग, मत्सर, स्वार्थ असे दूषित विचारामुळे सर्वत्र हिंसाचार घडत आहेत. प्रत्येकाच्या मनातील दुषित विचारावर मात करण्यासाठी प्रेम, दया, क्षमा, शांती संदेश महत्वपूर्ण ठरतो. जगा व जगू दया या उपदेशा मधून अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होत आहे. आज या विचारांचा प्रसार होणेची मोठी गरज आहे. जगभर शांतता नांदावी व अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशाने जीतो संघटनेचे जगातील २६ देशात आणि भारतात विविध शहरात ८० चॅप्टर वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्ये ३-५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटात ही रॅली संपन्न होत असल्याचे सांगितले डि एस पी पंडित यांनी अवघ्या जगाला मार्गदर्शक असणारे अहिंसा आणि प्रेमाचे विचार हे या रॅलीतून व्यक्त होत असून त्यामुळे समाजातील सकारात्मकते वाढीस लागेल अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि प्रेमाचे विचार हे या रॅलीतून व्यक्त होत असून त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढीस लागेल अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . प्रमुख पाहुण्यांनी झेंडा दाखवल्यानंतर पोलीस परेड ग्राउंड पासून धैर्यशील प्रसाद मंगल कार्यालय शिवार विद्यालय कसबा बावडा आणि परतीच्या मार्गावर या स्पर्धा तीन गटात संपन्न झाल्या या स्पर्धेतील विविध गटातील विजेते गिरी ऋषिकेश शिरूरकर यश कांबळे राहुल साळुंखे सुरज विचारे मीना देसाई यांच्यासह इतर सहभागी खेळाडूंना तसेच प्रायोजक संजय घोडावत समूह व इतरांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह - प्रमाणपत्र - मेडल देण्यात आले . गेले दीड महिना या स्पर्धेच्या संयोजनासाठी चेअरमन गिरीष शहा ' रोम कनव्हेनर जितेंद्र राठोड , उपाध्यक्ष रवी संघवी ,मुख्य सचिव अनिल पाटील, खजानीस रमणलाल संघवी , सदस्य शितल गांधी ,महिला आघाडी च्या अधक्षा श्रेया गांधी सचिव माया राठोड , सह सचिव स्विटी पोरवाल - पूजा काले ,युवा आघाडीचे अध्यक्ष चिंतन राठोड , सचिव चिन्मय कर्णावट, जितु भाई गांधी, शितल गांधी, जयेश ओसवाल 125 हून अधिक जीतो कोल्हापूर चाप्टर कार्यकर्ते कार्यरत होतेया टीमच्या कुशल नियोजनामुळे स्पर्धेच्या नियोजनापासून ते स्पर्धा संपन्न होईपर्यंत सर्व यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे राबवली गेली सर्व सहभागी खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र टी-शर्ट यासह अल्पोपहार व्यवस्था अत्यंत विनयशीलतेने देण्यात आली होती . अप्पल हॉस्पिटल ज्या व्यक्तीने यावेळी रुग्णवाहिक वैद्यकीय सेवा ही पुरवण्यात आली तर कोल्हापूर पोलीस दल आणि टीम रोहन व्हिडिओ यांचे यासाठी सहकार्य लाभले .
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.