नागरी समस्या सोडवण्यासाठी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान निश्चित फायदेशीर ठरणार - अजित पवार
xtreme2day
13-03-2024 14:25:35
367874
नागरी समस्या सोडवण्यासाठी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान निश्चित फायदेशीर ठरणार - अजित पवार
मुंबई (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. युवा नेते पार्थ पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटी व कार्यकर्ता मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात झपाट्यानं नागरीकरण होत असून शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचं प्रमाण वाढलंय. या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष लक्ष दिल आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यव्यापी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान राबविण्यात येत आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी 'राष्ट्रवादी सोसायटी कनेक्ट' अभियान निश्चित फायदेशीर ठरणार आहे. ही मार्गदर्शक पुस्तिका पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास मा. ना. अजित पवार यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री धंनजय मुंडे व पक्षाचे आमदार, राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टचे मुख्य समन्वयक योगेंद्र गायकवाड, मोहन मोरे, दिलावर शेख, नितेश गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.