वीर जिजामाता पुरस्काराने खेळाडूंच्या मातांचा गौरव -क्रीडा भारतीचा उपक्रम
xtreme2day
13-01-2024 00:13:57
984803
वीर जिजामाता पुरस्काराने खेळाडूंच्या मातांचा गौरव -क्रीडा भारतीचा उपक्रम
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) - क्रीडा क्षेत्रातील शिवराय घडवण्यासाठी मातांनी जिजाऊंचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन वैजापूरच्या माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेसी यांनी वीर जिजामाता पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत क्रीडा भारती तर्फे वैजापूर तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य पातळीवर छत्रपती संभाजीनगरचा झेंडा फडकवणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा 'वीर जिजामाता पुरस्कार' प्रदान करून नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रीडा भारतीचे वैजापूर तालुक्याचे संयोजक सतीश पाटील, अशोक एन. जे., संजय बोरणारे, सरपंच कौसाबाई थोरात, संतोष कासलीवाल, रमेश जेजुरकर, रवींद्र पवार, सुभाष बाळहसकर, डी.एस.गायकवाड यांची ह्यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ग्रँड सूर्या लॉन्सच्या सभागृहात आयोजित या गौरव सोहळ्यात राष्ट्रीय किर्तीचे खेळाडू आशा जाधव व राजेंद्र जाधव यांच्या मातोश्री ताराबाई जाधव, बॉक्सिंगची राष्ट्रीय खेळाडू नेहा वाघ व वेटलिफ्टिंगची राष्ट्रीय खेळाडू निकिता वाघ यांच्या मातोश्री शालिनी वाघ, राष्ट्रिय मैदानी खेळाडू गायत्री गायकवाड व अमृता गायकवाड यांच्या मातोश्री विठ्ठलबाई गायकवाड, राष्ट्रीय मॅरेथॉनपटू दिपाली तुपे व वैशाली तुपे यांच्या मातोश्री अनिता तुपे, राष्ट्रीय मैदानी खेळाडू लता गायकवाड यांच्या मातोश्री रुखमनबाई गायकवाड, राष्ट्रीय कबड्डीपटू जयश्री तुपे यांच्या मातोश्री अलका तुपे, राष्ट्रीय मॅरेथॉन पटू शितल जाधव यांच्या मातोश्री अनिता जाधव, राज्यस्तरीय खेळाडू- रेवती तुपे यांच्या मातोश्री नीता तुपे गीतांजली राऊत यांच्या मातोश्री पुष्पावती राऊत, साक्षी तुपे यांच्या मातोश्री सुवर्णा तुपे, पल्लवी तुपे यांच्या मातोश्री रंजना तुपे, अरुणा तुपे यांच्या मातोश्री निर्मला तुपे, साक्षी गायकवाड यांच्या मातोश्री शकुंतला गायकवाड, कल्याणी तुपे यांच्या मातोश्री निर्मला तुपे, प्रीती गायकवाड यांच्या मातोश्री मनीषा गायकवाड, धनश्री गुणराजे यांच्या मातोश्री वर्षा गुणराजे, आकांक्षा बोराडे यांच्या मातोश्री चंद्रकला बोराडे, प्रियंका तुपे यांच्या मातोश्री चंद्रकला तुपे, सविता पिंगट यांच्या मातोश्री शोभाताई पिंगट, ऋतुजा गायकवाड यांच्या मातोश्री कुसुम गायकवाड, वैशाली गायकवाड यांच्या मातोश्री मीराबाई गायकवाड, संतोष सोनवणे यांच्या मातोश्री ताराबाई सोनवणे, वंदना तुपे यांच्या मातोश्री सुमंन तुपे, अश्विनी गायकवाड यांच्या मातोश्री रंजना गायकवाड, प्रज्ञा तेझाड यांच्या मातोश्री वंदना तेझाड, भाग्यश्री काळे यांच्या मातोश्री आशा काळे, मानसी मोरे यांच्या मातोश्री माया मोरे, ऋतुजा पवार यांच्या मातोश्री मंदा पवार, पंडित यांच्या मातोश्री कल्पना पंडित, शारदा राऊत यांच्या मातोश्री मनीषा राऊत, साक्षी ढगे यांच्या मातोश्री रंजना ढगे, अमृता तुपे यांच्या मातोश्री प्रणिता तुपे यांना क्रीडा भारतीतर्फे वीर जिजामाता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत निंबाळकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारती वैजापुरचे गजानन गायके, मुख्याध्यापक विजय दारुंटे गणेश बोर्डे रवींद्र ढगे यांनी परिश्रम घेतले तर आभार बाळासाहेब व्यवहारे यांनी मानले. या सोहळ्यास वैजापूर तालुक्यातील नालेगाव, बाबुळगाव, गारज, मनोर, खंडाळा, शिवराई देहगाव, ढवळा, विजापूर वाकला, संजयपुरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र - क्रीडा भारतीतर्फे वीर जिजामाता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंच्या मातांन सोबत क्रीडा भारतीचे वैजापूर तालुक्याचे संयोजक सतीश पाटील दिसत आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.