xtreme2day 11-01-2024 08:17:07 45479
छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने ; उबाठाचा आक्रोश मोर्चा तर शिंदे गटाचा जल्लोष ! छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) - शिवसेना ही शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्याकंडून काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध व्यक्त केला गेला. तर समोरच्या बाजूने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला गेला. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्याकंडून काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध व्यक्त केला गेला. तर समोरच्या बाजूने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येतोय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला जातोय. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पण पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवलं जात आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये असे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जल्लोष सुरु होता. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.