अखंडीत 151 वा सप्ताह, भगवान परशुराम स्तंभ ; ब्राह्मण महिला आघाडीच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येवरून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) - अखंडीत 151 वा सप्ताह, भगवान परशुराम स्तंभ पूजन ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंदजी दामोदरे यांनी केले तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथून आलेल्या मंगल अक्षता कलश पूजन ब्राह्मण महिला आघाडीच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ब्राह्मण समाज समन्वय समितीचे पदाधिकारी दामोदर, मंगेश पळसकर, आनंदजी तांदुळवाडीकर, ब्राह्मण युवकांची महिला आघाडी व ब्राह्मण युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कलशाचे विधीवत पुजन उपाध्ये श्री पुजारीगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.तसेच मंदिरावर आधारीत गीत सादर करण्यात आले. श्री ऊदयजी जोशी यांनी २२/०१/२४ ला होत असलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगीतली. प्रास्ताविक ज. मो. हरसुलकर यांनी केले व स्तंभ पुजनाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषण मिलिंद दामोदरे यांनी केले.