Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 अहिल्यादेवी नगर

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राहुरीला आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी केले मार्गदर्शन

xtreme2day   28-12-2023 15:03:12   219074

महात्मा  ज्योतिबा फुले महाविद्यालय राहुरीला आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी केले मार्गदर्शन

राहुरी महाविद्यालयात 1800 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

राहुरी/ अहिल्यानगर ( प्रतिनिधी) - आपल्या घरामध्ये आई-बाबा नसताना मुलांनो वीजेच्या बटनांमध्ये लोखंडाच्या टोकदार वस्तू घालण्याचा प्रयत्न करू नये आणि मुलींनी कधीही घरात आई नसताना गॅस चा वापर करू नका. कुठल्याही यात्रेत गर्दीत आपल्या आई बाबा काका भाऊं पासून हरविला तर पोलीस काका, पोलीस मावशी यांच्या जवळ जावे, मूळची माणसं सोबत जाऊ नये असे मार्गदर्शन महात्मा  ज्योतिबा फुले महाविद्यालय राहुरीला आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांनी केले.व्यासपीठावर डॉक्टर जयपाल पाटील आणि सोबत प्राचार्य हर्ष तूपविहारे, डॉ.सुभाष भागले,बाळासाहेब डोंगरे,आठरे मॅडम,जितेंद्र नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांकडून संविधान वाचन डॉ.जयपाल पाटील यांनी करून घेतले.आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य हर्ष तूपविहारे      म्हणाले, ती आपत्ती कधी केव्हा आणि कशाप्रकारे घरामध्ये घराच्या बाहेर शेतामध्ये शाळेत जाता येता यासाठी कशी काळजी घ्यावी, त्याची आपल्यास माहिती असावी यासाठी. रायगड वरून आंतरराष्ट्रीय आपत्ती विषयक अभ्यासक व तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांना आज पाचारण केले असून ते ते सांगतील. मुलांनी आचरणात आणावे. यानंतर महाविद्यालयातर्फे डॉ. जयपाल पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर शाळा समिती चेअरमन तथा  विद्यापीठ प्रमुख  महानंद माने यांनी सुभेछा पाठविल्या नंतर घरात शेतावर रस्त्यात कुठेही अपघात झाला तर 108 रुग्णवाहिकेला त्याची प्रात्यक्षिक देता108 च्या  नगर जिल्ह्या प्रमुख डॉ.सुवर्ण माला यांना फोन करतात 108 रुग्णवाहिका डॉ.बागले, पायलट दत्ता मेहत्रे उपस्थित राहून डॉक्टर बागले यांनी 108 रुग्णवाहिकेची माहिती देऊन सीपीआर चे प्रात्यक्षिक दिले. मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कसे कार्यरत आहेत व त्यांचा लाभ आपण कसा घ्यायचा यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांना फोन करतात 20  मिनिटांनी बीट अंमलदार 112 चा हवलदार अंबादास गीते हजर होऊन 112 क्रमांक चा उपयोग कसा होतो याची माहिती दिली. यानंतर आपल्याला साफ अथवा विंचू दश झाला,तर अशावेळी प्राथमिक उपचाराची प्रात्यक्षिक घरातील गॅस, गिझर, वीजेच्या साधनांची कोणती काळजी घेणे, मुला मुलींना मोबाईलचा वापर शिक्षणा साठीच करावा असे सांगितले.या कार्यक्रमास महाविद्यालय माध्यमिक प्राथमिक आणि इंग्रजी विभागाचे 1480 मुले- मुली व 67 शिक्षक, कर्मचारी रुंद उपस्थित होता. शेवटी आभार जितेंद्र नेतकर या सरांनी मांडले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
EGJuzpytfCK 21-12-2024 02:29:43


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती