भाजपाच्या छत्रपती संभाजीनगरच्यालोकसभा संयोजकपदी बबन नरवडे यांची नियुक्ती
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) - माजी नगरसेवक बबन नरवडे यांची भारतीय जनता पार्टी(अनुसूचित जाती मोर्चा) छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बबन नरवडे हे सद्या भाजपा अनुसूचित जाती मोर्च्यांचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस असून त्यांनी भाजपाचे संभाजीनगर पश्चिम मतदार संघाचे विस्तारक म्हणून उत्कृष्ट कार्य केले होते आणि त्यामुळे भाजपा अनुसूचित मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री दिलिप कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा संयोजकपदी माजी नगरसेवक बबन नरवडे यांची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या ह्या नियुक्ती बदल केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, अनु मोर्चा प्रदेश प्रभारी राजु शिंदे, जिल्हा सरचिटणीस जालिंदर शेंडगे, अनु मोर्चा शहर अध्यक्ष लक्ष्मण शिंदे आदींनी बबन नरवडे यांचे अभिनंदन केले आहे.