Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

भारताच्या अण्वस्त्र धोरणात पहिल्यांदाच मोठा बदल; पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रं तैनात, या अण्वस्त्रांच्या टप्प्यात संपूर्ण चीन

xtreme2day   09-06-2026 20:41:15   204185701

भारताच्या अण्वस्त्र धोरणात पहिल्यांदाच मोठा बदल; पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रं तैनात, या अण्वस्त्रांच्या टप्प्यात संपूर्ण चीन

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारतानं पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. भारताच्या अण्वस्त्र धोरणात पहिल्यांदाच मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतानं तैनात केलेल्या अण्वस्त्रांच्या टप्प्यात संपूर्ण चीन आला आहे. शेजारच्या चीननं ३४ अण्वस्त्रं तैनात केली आहेत.

 

भारतानं १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. शांतता काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच अण्वस्त्रं तैनात केली गेली आहेत. स्वीडिश थिंकटँक स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) नव्या अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. चीनंदेखील आपल्या अण्वस्त्र तैनातीत वाढ केली आहे. २०२६ मध्ये चीननं ३४ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. चीन आणि भारतदेखील आता शांतता काळाच्या दरम्यानही कधीकधी क्षेपणास्त्रांवर कमी संख्येनं अण्वस्त्रं तैनात करू शकतात, असा उल्लेख SIPRI च्या अहवालात आहे. जानेवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतानं १२ अण्वस्त्रं तैनात केली आहेत. चीननं ३४ अण्वस्त्रं तैनात करुन ठेवली आहेत. गेल्या वर्षी चीननं २४ अण्वस्त्रं तैनात केली आहे. त्यात यंदा दहानं वाढ झाली आहे. रशियानं सर्वाधिक अण्वस्त्रं तैनात केली आहेत. अमेरिकेकडे १,७७०, रशियाकडे १,७९६, फ्रान्सकडे २८० आणि ब्रिटनकडे १२० तैनात अण्वस्त्रं आहेत.

 

SIPRI नं सोमवारी SIPRI Yearbook २०२६ जारी केली. जगभरातील देश आता राष्ट्रीय शक्तीच्या साधनाच्या रुपात अण्वस्त्रांवर आधीपेक्षा जास्त अवलंबून असल्याचं निरीक्षण SIPRI कडून नोंदवण्यात आलं आहे. जगभरात जवळपास ४,०१२ अण्वस्त्रं क्षेपणास्त्रं आणि विमानांसोबत तैनात करण्यात आली आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत जगात एकूण १२,१८७ अण्वस्त्रं होती. यातील जवळपास ९,७४५ अण्वस्त्रं संभाव्य वापरासाठी ठेवण्यात आली आहेत. SIPRI च्या अहवालात अण्वस्त्र संपन्न देशांचा उल्लेख आहे. यामध्ये अमेरिका , रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत , पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायलचा समावेश आहे. वार्षिक अहवालानुसार, २१०० ते २२०० तैनात अण्वस्त्रं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं हाय ऑपरेशनल अलर्ट स्थितीत ठेवण्यात आलेली आहेत. यातील जवळपास सगळी क्षेपणास्त्रं रशिया आणि अमेरिकेची आहेत. तर काही अण्वस्त्रं फ्रान्स आणि ब्रिटनची आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती